Categories

Most Viewed

अमृतवाणी ही बुद्धाची

अमृतवाणी ही बुद्धाची, ऐक देऊनी ध्यान
साधण्या या जन्मी निर्वाण II

धम्माइतकी सुयोग्य शिकवण
अन्य कुठेही मिळे न शोधून
तथागताची शाश्वत सत्ये , स्वानुभवाने जाण ,
साधण्या या जन्मी निर्वाण II

तृष्णेपोटी दु:ख निर्मिती ,
जसे तिच्यातून अंकूर येती
दु:खबीज ते नष्ट कराया , अष्टशील तू जाण
साधण्या या जन्मी निर्वाण II

अमृतवाणी ही बुद्धाची , ऐक देऊनी ध्यान
साधण्या या जन्मी निर्वाण II

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password