Categories

Most Viewed

21 जुलै दिनविशेष

दिनांक 21 जुलै 1942 :
नॅशनल सिमेन्स यूनियन मुंबई तर्फे ताजमहल हॉटेल मध्ये झालेल्या सत्कार समारंभाच्या वेळी मजूर खात्याचे मंत्री या नात्याने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबईतील पहिले जाहीर भाषण झाले.
सदर भाषण दैनिक नवाकाळ मुंबई 23 जुलै 1942 रोजी प्रसिद्ध करण्यात आले.

Date 21 July 1942 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar, as the Minister of Labor, delivered his first public address in Mumbai during the felicitation ceremony held by National Siemens Union Mumbai at Taj Mahal Hotel.
The speech was published in the daily Navakal Mumbai on 23 July 1942.

दिनांक 21 जुलै 1946 :
पुणे येथे शेडयुल्ड कास्टस फेडरेशनच्या सत्याग्रही कार्यकर्त्यांच्या उपोषण शिबिरास विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भेट देऊन सत्याग्रहीचे कौतुक करून त्यांचे नीतिधैर्य वाढविले.

Date 21 July 1946 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar visited the fasting camp of Satyagrahi activists of Scheduled Castes Federation at Pune and praised the Satyagrahi and enhanced his morale.

दिनांक 21 जुलै 1946 :
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व आरोपांना नि धमक्यांना उत्तर देताना वार्ताहरांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, “ब्रिटिशांनी हिंदुस्तान सोडावयाचे ठरविले आहे. सत्ता स्पृश्य हिंदू आणि मुसलमान यांच्या हाती पडणार आहे. म्हणून आम्ही काँग्रेसला असे विचारीत आहोत की, तुम्ही या सहा कोटी दलित समाजाला नवीन घटनेप्रमाणे कोणते हक्क देणार याचा आराखडा प्रसिद्ध करा. अस्पृश्यांचे न्याय हक्क प्राप्त करून घेण्यासाठी सर्व हिंदुस्थानभर लढा सुरू होईल”.

Date 21 July 1946 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar, while replying to all the allegations and threats, said in an interview to reporters, “The British have decided to leave Hindustan. Power will fall in the hands of untouchable Hindus and Muslims. Publish the plan of the one who will give rights. The fight will start all over India to get the justice rights of the untouchables “.

दिनांक 21 जुलै 1946 :
पुणे येथे येथील झालेल्या अहिल्याश्रमात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड जनसमुदायाला संबोधित करताना म्हणाले की, “या देशातील कोणतेही राजकीय पक्ष आमच्या स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा देत नाहीत”.

Date 21 July 1946 :
Addressing a large gathering at Ahilya Ashram in Pune, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar said, “No political party in this country supports our freedom struggle.”

दिनांक 21 जुलै 1948 :
घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी हिंदू कोड बिलाला विरोध केला.

Date 21 July 1948 :
Dr. Rajendra Prasad, chairman of the Constitution committee, opposed the Hindu Code Bill.

दिनांक 21 जुलै 1950 :
भारत सरकारचे कायदेमंत्री विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मनमाड मार्गाने औरंगाबाद येथे स्पेशल सलूनने आले. रोटेगाव लासूर येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे असंख्य जनसमुदायाने मोठ्या आदराने व भक्तीभावाने स्वागत केले.

Date 21 July 1950 :
Law Minister of the Government of India Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar came to Aurangabad by special saloon on Manmad Marg. At Rotegaon Lasur, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was welcomed by a large number of people with great respect and devotion.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password