Categories

Most Viewed

20 जुलै दिनविशेष

दिनांक 20 जुलै 1913 :
भीमराव आंबेडकरांनी न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापिठातील राज्यशास्त्र शाखेत प्रवेश घेतला.

Date 20 July 1913 :
Bhimrao Ambedkar entered the Division of Political Science at Columbia University in New York.

दिनांक 20 जुलै 1924 :
अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी सामाजिक चळवळ उभी करण्याच्या दृष्टीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली बहिष्कृत हितकारणी सभेची दामोदर हॉल, परळ मुंबई येथे स्थापना झाली.
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते.

Date 11 July 1924 :
Dr. Vishwaratna with a view to creating a social movement for the upliftment of the untouchables. Under the chairmanship of Babasaheb Ambedkar, the expelled Hitkarani Sabha was established at Damodar Hall, Parel, Mumbai.
Learn, Organize and Struggle is the motto of this organization.

दिनांक 20 जुलै 1927 :
पुणे येथील मांगवाड्यात पुण्याच्या दीनबंधू पत्राचे संपादक डॉक्टर नवले यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्य लोकांच्या जाहीर सभेत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात सांगितले की, महार जातीवरील अप्पल पोटेपणाचा आरोप निराधार आहे.
सदर भाषण बहिष्कृत भारत अंकात 29 जुलै 1927 रोजी प्रसिद्ध करण्यात आले.

Date 20 July 1927 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar in his speech at a public meeting of untouchables chaired by Dr. Navale, Editor, Deenbandhu Patra, Pune, Mangwada, Pune, said that the allegation of appetite for Mahar caste is baseless.
The speech was published in the issue of Bahishkrit Bharat on July 29, 1927.

दिनांक 20 जुलै 1937 :
स्वतंत्र मजूर पक्षातील मुंबई प्रांतिक असेंबलीच्या सभासदांची पहिली सभा पुणे येथे अहिल्याश्रमात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भरली.
सदर भाषण जनता अंकात 31 जुलै 1937 रोजी प्रसिद्ध करण्यात आले.

Date 20 July 1937 :
The first meeting of the members of the Mumbai Provincial Assembly of the Independent Labor Party was held at Ahilya Ashram in Pune under the chairmanship of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar.
The speech was published in the issue of Janata on July 31, 1937.

दिनांक 20 जुलै 1942 :
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुर येथून मजूर मंत्र्यांच्या खात्याचे काम स्वीकारले.

Date 20 July 1942 :
Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar accepted the post of Labor Minister from Nagpur.

दिनांक 20 जुलै 1952 :
सिद्धार्थ बोर्डिंग संगमनेर मधील महार समाज सेवा संघाच्या इमारत फंड प्रसंगी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात प्रश्न केला की, शिक्षित मुले समाजाच्या उन्नती प्रित्यर्थ काही करणार आहेत का ?
सदर भाषण जनता अंकात 26 जुलै 1952 रोजी प्रसिद्ध करण्यात आले.

Date 20 July 1952 :
In his speech on the occasion of building fund of Mahar Samaj Seva Sangh at Siddharth Boarding Sangamner, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar asked, will the educated children do anything for the betterment of the society ?
The speech was published in the issue of Janata on July 26, 1952.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password