तिबेट देशातील सर्वोच्च चौदावे धार्मिक नेते दलाई लामा तेन्झिन ग्यात्सो यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा.
जगभरातील बौद्ध यांना आपले धर्मगुरू मानतात. ‘दलाई’ म्हणजे महासागर व ‘लामा’ म्हणजे ज्ञान. दलाई लामा या संयुक्त शब्दाचा अर्थ ज्ञानाचा महासागर असा आहे.
त्यांनी तिबेट मुक्तीसाठी विविध शांतताप्रिय मार्गानी झगडत आहेत, आंदोलने करीत आहेत व आपल्यावरील अन्यायाची गाथा जगासमोर हिरिरीने मांडीत आहेत. जागतिक स्तरावर तिबेटची बाजू मांडण्यात ते पूर्णपणे यशस्वी झाले आहेत. याच कारणासाठी त्यांच्या शांतताविषयक प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना 1989 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले.
आतापर्यंत त्यांनी जगभरातील 62 देशांना भेटी दिल्या असून 72पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. शांती, अहिंसा, आंतर-धार्मिक सलोखा, सार्वभौमिक जबाबदारी आणि करुणा या त्यांच्या विचारांच्या मान्यतेमुळे त्यांना शांततेचे मानद डॉक्टरेट, पुरस्कार, सन्मान प्राप्त झाले आहेत. तसेच त्यांना ‘लिओपोल्ड ल्यूकास अवॉर्ड ‘ देण्यात आला आहे. 2005 आणि 2008 मध्ये त्यांना जगातील 100 महान व्यक्तिमत्वच्या यादीत समाविष्ट आहे होते.

Dinesh K Avhad
July 6, 2021 at 3:23 pmWish You Happy Birthday Dalai Lama Ji. 🙏
Suresh Hire
July 14, 2021 at 12:38 amजयभीम बंधू आणि धन्यवाद.