Categories

Most Viewed

भारिप बहुजन महासंघ

दिनांक 04 जुलै 1994 :
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अँड प्रकाश आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघ म्हणजेच भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली. अँड प्रकाश आंबेडकर हे या राष्ट्रीय पक्षाचे संस्थापकीय अध्यक्ष होते. अकोला येथील त्यांच्या निवासस्थानी दिनांक 14 मार्च 2019 रोजी अँड प्रकाश आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघ या पक्षाला वंचित बहुजन आघाडी या पक्षात विलीन करण्याचे जाहीर केले. दिनांक 08 नोव्हेंबर 2019 रोजी भारिप बहुजन महासंघ हा वंचित बहुजन आघाडीमध्ये विलीन करण्यात आला.

भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघ या पक्षाने आपले ध्येय आणि उद्दिष्ट्ये ठरविले आहेत. वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या जाहीरनाम्यांमधून व ठरावांमधून ते प्रतित झालेले आहेत. ते खालीलप्रमाणे ;

1) भारतीय रिपब्लिकन पक्ष-बहुजन महासंघाने राज्यातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल असणा-या समाजघटकांची प्रगती करणे, त्यांना सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात न्याय संपादन करून देण्यासाठी प्रयत्न करणे.

2) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर बौद्ध झालेल्या दलितांना त्यांच्या सवलती कायम राहाव्या.

3) आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या समाजघटकांना सवलती देण्यात याव्या यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी शासनाने ताबडतोब करावी.

4) औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ’ असे नामांतर करणारा ठराव महाराष्ट्र शासनाने ताबडतोब अंमलात आणला जावा.

5) सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे.

6) ग्रामीण भागामधून शहरी भागामध्ये स्थलांतरित लोकांना राहण्यासाठी पडिक व ओसाड जागेवर त्यांनी झोपड्या बांधून निवारा मिळविला. अशा झोपडपट्या नियमित करणे त्यांना संरक्षण मिळवून देणे व तेथे विकास घडवून आणणे.

7) जात, धर्म, वंश, भाषा, पंथ व लिंग इत्यादी बाबत कोणताही भेदभाव न करता या सर्व समाजघटकांची सर्वांगीण प्रगती घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे.

8) समाजातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी समाज, अल्पसंख्यांक समाजाला व उपेक्षित समाजाला संघटित करून या समाजघटकांना राजकीय सत्ता मिळवून देणे.

9) लोकशाहीच्या शांततामय व सनदशीर मार्गाचा अवलंब करणे व देशाची राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येणार नाही याची काळजी घेणे.

10) देशातील वाढत्या जातीयवादाला व जमातवादाला प्रखरपणे विरोध करणे व समताधिष्ठीत समाजरचना निर्माण करण्याचा प्रयत्न करणे.

11) ओबीसी समाजाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी या समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याबाबतचा व विविध क्षेत्रात सवलती देण्याबाबतचा पुरस्कार करणे.

12) राज्यामध्ये राजकीय सत्तेत घराणेशाही वाढत आहे. त्यामुळे प्रस्थापितांचे वर्चस्व वाढत आहे. याला सर्वतोपरी विरोध करणे.

13) बहुसंख्येने शोषित, पिडित जनता असलेल्या या देशात आर्थिक सत्तेच्या केंद्रीकरणाला आळा घालणे.

14) महिलांना संघटित करून त्यांच्यातील भिती नष्ट करणे, त्यांना पुरुषांप्रमाणे समान हक्क प्रस्थापित करणे व कायद्याने सर्व बाबतीत समान दर्जा प्रदान करणे.

15) राज्यातील अतिरिक्त पडित जमीन भूमिहिन शेतमजूरांना वाटप करणे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password