Categories

Most Viewed

00 जुन दिनविशेष

दिनांक 00 जून 1916 : भीमराव आंबेडकरांनी पीएचडी च्या पदवीसाठी द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया : अ हिस्टरिकल अँड अँनालेटिकल स्टडी या नावाचा प्रबंध कोलंबिया विद्यापीठाला सादर केला. तो विद्यापीठाने स्वीकाला. त्यानंतर पी एस किंग अँड कंपनी लंडन यांनी दि व्हॅल्युएशन प्रोविन्शियल फायनान्स इन ब्रिटीश इंडिया या नावाने प्रकाशित केला.

Dated 00 June 1916 : Bhimrao Ambedkar submitted his Ph.D dissertation, The National Dividend of India: A Historical and Analytical Study, to Columbia University. He was accepted by the university. It was later published by P S King & Company London under the title The Valuation Provincial Finance in British India.

दिनांक 00 जून 1925 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर दिवसातून थोडावेळ बाटलीबॉय अकाउंटन्सी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संस्थेत जुन 1925 पासुन मार्च 1928 पर्यंत शिक्षकाचे काम करीत असत.

Dated 00 June 1925 : Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar used to work as a teacher in the Battleboy Accountancy Training Institute from June 1925 to March 1928.

दिनांक 00 जून 1928 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी सोलापूर व बेळगाव येथे वस्तीगृहे सुरू केली.

Dated 00 June 1928 : Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar started hostels for untouchable students at Solapur and Belgaum.

दिनांक 00 जून 1931 : कोचीन संस्थान मधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी चालविलेल्या मंदिर प्रवेशाच्या झगड्यात आपण भाग घ्यावा की काय ? अशी त्रिचुरच्या अस्पृश्यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांजवळ विचारणा केली.

Dated 00 June 1931 : Should we take part in the temple entry struggle run by Congress workers in Cochin Sansthan? Such untouchables of Trichur asked Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar.

दिनांक 00 जून 1934 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दत्तोबा पवार यांना पाठवलेल्या पत्रात लिहिले की, ‘विधी महाविद्यालयातील कामाचा ताण फार पडे. ते काम त्यांना अतिशय कष्टाचे वाटे. त्यामुळे ते थकून जात. आपली आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे आपणास हे काम सोडता येत नाही’.

Dated 00 June 1934 : Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar wrote in a letter to Dattoba Pawar that, ‘Work in law college is very stressful. They found the work very difficult. So they get tired. I can’t quit this job because my financial situation is not good.’

दिनांक 00 जून 1945 : व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अन टचेबल्स ? हा विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय विषयाशी संबंधित ग्रंथ प्रकाशित झाला.

Dated 00 June 1945 : What Congress and Gandhi have done to the untouchables? This Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar’s book on political issues was published.

दिनांक 00 जून 1946 : भारतभूषण मुद्रणालय दंग्यात खाक करण्यात आल्यानंतर, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक दादर येथील राजगृहात बोलवली.

Dated 00 June 1946 : After the Bharatbhushan Press was destroyed in the riots, Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar convened a meeting of his party’s executive at the Rajgriha in Dadar.

दिनांक 00 जून 1951 : सिद्धार्थ कॉलेज मरीन लाईन्स हटमेंट मधून फोर्टमधील मेनकवा आणि अल्बर्ट या प्रशस्त इमारतीत हलवण्यात आले. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्या इमारतीचे अनुक्रमे बुद्ध भवन आणि आनंद भवन असे नामकरण केले.

Dated 00 June 1951 : Siddhartha College was moved from the Marine Lines Hutment to the spacious buildings of Menkawa and Albert in Fort. Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar named the building as Buddha Bhavan and Anand Bhavan respectively.

दिनांक 00 जून 1954 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व म्हैसूरचे महाराज यांच्यात झालेल्या भेटीत बंगलोर येथे भारतात बौध्द धर्माचा प्रसार करण्यासाठी सभेच्या इमारतीसाठी महाराजांनी पाच एकर जागा देण्याचे मान्य केले.

Dated 00 June 1954 : During a meeting between Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar and the Maharajah of Mysore, the Maharajah agreed to allot five acres of land for a meeting building at Bangalore to spread Buddhism in India.

दिनांक 00 जून 1956 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधी महाविद्यालय सुरू केले.

Dated 00 June 1956 : Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar started Mumbai Law College.

टिप : सदर घटना जुन महिन्यातील असून तारीख वाचण्यात आलेली नाही.

Note: This event is junction with the month of June and the date is not read.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password