Categories

Most Viewed

शाहू महाराज जुलै महिना

दिनांक 01 जुलै 1893 :
कोल्हापूरचे ब्रिटिश राजनैतिक कर्नल सी वूडहाऊस यांनी मुंबईच्या राजकीय विभागाच्या सचिवांना पत्र लिहून त्या पत्रात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूर संस्थानचे पूर्ण अधिकार देण्याची आणि त्यादृष्टीने शिक्षण देण्याची मागणी केली.

Dated 01 July 1893 :
Colonel C. Woodhouse, a British diplomat from Kolhapur, wrote a letter to the Secretary of the Mumbai Political Department, demanding that Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj be given full authority over the Kolhapur Sansthan and educated accordingly.

दिनांक 31 जुलै 1897 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे पहिले सुपुत्र राजाराम महाराज यांचा जन्म.

Dated 31 July 1897 :
Birth of Rajaram Maharaj, the first son of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj.

दिनांक 02 जुलै 1902 :
ब्रिटीश युवराज प्रिन्स ऑफ वेल्स कडून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना थाटाची मेजवानी देण्यात आली.

Dated 02 July 1902 :
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj was given a banquet by the British Prince of Wales.

दिनांक 05-10 जुलै 1902 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची स्कॉटलंड येथे भेट.

Dated 05-10 July 1902 :
Visit of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj to Scotland.

दिनांक 11 जुलै 1902 :
रॉयल कोलोनियल इन्स्टिट्यूट लंडन येथे राज्याभिषेक निमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेजवानी भारतीय संस्थानिकांच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे भाषण.

Dated 11 July 1902 :
Speech by Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj on behalf of the Indian colonists at the coronation ceremony held at the Royal Colonial Institute, London.

दिनांक 18 जुलै 1902 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी पॅरिस येथील आयफेल टॉवर व सम्राट नेपोलियन यांच्या समाधीला भेट दिली.

Dated 18 July 1902 :
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj visited the Eiffel Tower in Paris and the tomb of Emperor Napoleon.

दिनांक 21 जुलै 1902 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी व्हेनिसला भेट दिली.

Dated 21 July 1902 :
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj visited Venice.

दिनांक 24 जुलै 1902 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी फ्लोरेंस इटली येथील आजोबा छत्रपती राजाराम महाराज यांचा पुतळा व समाधीचे दर्शन घेतले.

Dated 24 July 1902 :
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj visited the statue and Samadhi of his grandfather Chhatrapati Rajaram Maharaj in Florence, Italy.

दिनांक 26 जुलै 1902 :
मागासलेल्या वर्गाकरिता सरकारी नोकरीत 50% जागा राखीव ठेवण्याचा जाहीरनामा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी काढला.

Dated 26 July 1902 :
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj issued a manifesto to reserve 50% of government jobs for the backward classes.

दिनांक 26 जुलै 1902 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी नेपल्स आणि तेथील माउंट व्हेसुव्हिअस या ज्वालामुखीस भेट दिली.

Dated 26 July 1902 :
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj visited Naples and Mount Vesuvius.

दिनांक 28 जुलै 1902 :
जप्त केलेले इनाम परत मिळावे म्हणून राजपुरोहित नारायण राजू पाध्ये यांचे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना विनंती पत्र लिहिले.

Dated 28 July 1902 :
Rajpurohit Narayan Raju Padhye wrote a letter to Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj to get back the confiscated prize.

दिनांक 29 जुलै 1902 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रोम व व्हेनिसला भेट दिली.

Dated 29 July 1902 :
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj visited Rome and Venice.

दिनांक 10 जुलै 1905 :
करवीर पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि त्यांच्या परिवाराचे वेदोक्ताचे धार्मिक अधिकार मान्य केले.

Dated 10 July 1905 :
Jagadguru Shankaracharya of Karveer Peetha recognized the religious rights of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj and his family as Vedokta.

दिनांक 00 जुलै 1906 : तारीख निश्चित नाही.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सिद्धांत विजय या संस्कृत ग्रंथाची मराठी आवृत्ती प्रसिद्ध केली.

Dated 00 July 1906 : Date not fixed.
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj published the Marathi version of the Sanskrit text Siddhanta Vijay.

दिनांक 00 जुलै 1908 : तारीख निश्चित नाही.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना निनावी पत्र लिहून धार्मिक दहशतवाद्यांनी खुनाची धमकी दिली.

Dated 00 July 1908 : Date not fixed.
Religious terrorists threatened to kill Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj by writing an anonymous letter.

दिनांक 00 जुलै 1910 : तारीख निश्चित नाही.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी नामदेव बोर्डिंगला दोन हजार रुपयांची देणगी दिली.

Dated 00 July 1910 : Date not fixed.
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj donated two thousand rupees to Namdev Boarding.

दिनांक 15 जुलै 1912 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी कायदा मान्य केला.

Dated 15 July 1912 :
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj passed the Co-operative Credit Society Act.

दिनांक 00 जुलै 1913 : तारीख निश्चित नाही.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक शाळेची स्थापना केली.

Dated 00 July 1913 : Date not fixed.
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj established Satyashodhak School.

दिनांक 00 जुलै 1913 : तारीख निश्चित नाही.
दिन मित्रकार मुकुंदराव पाटील यांचे कुलकर्णी लीलामृत हे आधुनिक मराठीतील पहिले विडंबन काव्य राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या मदतीने प्रकाशित झाले.

Dated 00 July 1913 : Date not fixed.
The first satirical poem in modern Marathi, Kulkarni Lilamrut by Din Mitrakar Mukundrao Patil, was published with the help of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj.

दिनांक 16 जुलै 1914 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य वीर चिमासाहेब महाराज यांचे कराची येथे स्मारक उभे करण्यासाठी जमीन खरेदी केली.

Dated 16 July 1914 :
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj bought land in Karachi to erect a memorial to freedom fighter Chimasaheb Maharaj in the freedom struggle of 1857.

दिनांक 25 जुलै 1917 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले.

Dated 25 July 1917 :
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj made primary education free and compulsory.

दिनांक 27 जुलै 1917 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाहाचा कायदा व विवाह नोंदणी कायदा लागू केला.

Dated 27 July 1917 :
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj enacted the Widow Remarriage Act and the Marriage Registration Act.

दिनांक 13 जुलै 1918 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थान मध्ये प्रायोगिक तत्त्वावर ग्रामपंचायती सुरू केल्या.

Dated 13 July 1918 :
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj started Gram Panchayat in Kolhapur Sansthan on an experimental basis.

दिनांक 13 जुलै 1918 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या.

Dated 13 July 1918 :
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj appointed officers for the implementation of free and compulsory primary education.

दिनांक 18 जुलै 1918 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सुपुत्र प्रिन्स शिवाजीच्या निधनाचे वृत्त ऐकून मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन शोक समाचारास आले.

Dated 18 July 1918 :
Lord Willingdon, the Governor of Mumbai, mourned the death of Prince Shivaji, son of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj.

दिनांक 13 जुलै 1919 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जिवलग मित्र आणि भावनगरचे महाराज श्री भाऊसिंहजी महाराज यांचे निधन प्रसंगी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी भावनगरला भेट दिली.

Dated 13 July 1919 :
On the occasion of the demise of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj’s close friend and Bhavnagar Maharaj Shri Bhausinhaji Maharaj, Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj visited Bhavnagar.

दिनांक 01 जुलै 1920 :
राजपुत्र शिवाजी यांच्या स्मरणार्थ श्री प्रिन्स शिवाजी मराठा फ्री बोर्डिंग हाऊस वसतिगृहाची स्थापना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केली.

Dated 01 July 1920 :
Shri Prince Shivaji Maratha Free Boarding House Hostel was established by Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj in memory of a Rajputra Shivaji.

दिनांक 06 जुलै 1920 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिवाजी क्षत्रिय वैदिक स्कूलचे उद्घाटन केले.

Dated 06 July 1920 :
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj inaugurated Shivaji Kshatriya Vedic School.

दिनांक 20 जुलै 1920 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी नाशिक येथील अस्पृश्य वस्तीगृहात पाच हजार रुपयांची देणगी दिली.

Dated 20 July 1920 :
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj donated five thousand rupees to an untouchable hostel in Nashik.

दिनांक 20 जुलै 1920 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी नागपूर येथील चोखामेळा वसतिगृहात पाच हजार रुपयांची देणगी दिली.

Dated 20 July 1920 :
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj donated five thousand rupees to the Chokhamela hostel in Nagpur.

दिनांक 27 जुलै 1920 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी हुबळी येथील कर्नाटक ब्राम्हणेत्तर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष पद भूषविले.

Dated 27 July 1920 :
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj became the President of the Karnataka Non-Brahmin Social Council at Hubli.

दिनांक 12 जुलै 1921 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी गावोगावच्या सभेमध्ये रेड्यांचा बळी देण्याची अमानुष प्रथा बंद करण्याचा हुकूम दिला.

Dated 12 July 1921 :
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj in a village meeting ordered to stop the inhumane practice of sacrificing redas.

दिनांक 31 जुलै 2001 :
समाजात मूलभूत स्वरुपाची क्रांतिकारक जडणघडण करण्यासाठी झटणार्‍या व्यक्तींना देण्यात येणारा राजर्षी शाहू महाराज समता पुरस्कार दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल यांना जाहीर करण्यात आला.

Dated 31 July 2001 :
The Rajarshi Shahu Maharaj Samata Award, which is given to those who strive for a fundamental revolution in the society, was announced to Dr. Jabbar Patel.

दिनांक 23 जुलै 2018 :
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ पुरस्कार मरणोत्तर देण्यात यावा अशी मागणी संसदेत राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली.

Dated 23 July 2018 :
NCP MP Dhananjay Mahadik has demanded that Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj be posthumously awarded India’s highest civilian honor, the Bharat Ratna.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password