दिनांक 29 जुन 1868
मराठी समाजसुधारक आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी तसेच कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी या संस्थेचे संस्थापक लोकहितवादी रावबहाद्दूर सीताराम केशव बोले उर्फ सी.के. बोले यांचा जन्म.
(मृत्यू : 14 जानेवारी 1961)
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील एक
विनोदी प्रसंग !!
उत्तर भारतातील निवडणूक प्रचार करून दिल्लीहून डॉ बाबासाहेब आंबेडकर मुंबईस आले. बोरीबंदर स्टेशनवर पंजाब मेलने रविवारी दिनांक 18 नोव्हेंबर 1951 रोजी ते उतरले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी सुमारे सहा हजार स्त्री-पुरुष स्टेशनात ‘बाबासाहेब आंबेडकर झिंदाबाद’ अशा गर्जना करीत उभे राहिले होते. हा स्वागत समारंभ फेडरेशनच्या वार्ड कमिटी आणि सोशलीस्ट पक्ष
यांच्यातर्फे संयुक्तपणे आखण्यात आला होता. बाबासाहेब निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईस आलेले होते. प्लॅटफॅार्म वर जागा नसल्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्वागतासाठी प्लॅटफॅार्म क्रमांक 8 व 9 च्या दरम्यानच्या मोकळ्या जागेत दोन खुर्च्या टाकून सोय केली. खुर्च्यांवर बाबासाहेब व माईसाहेब बसले. इतक्यात गर्दीतून 85 वर्षांचे वृद्ध श्री. सीताराम केशव बोले हे आले. त्यांना बसायला खुर्ची नव्हती. तेव्हा बाबासाहेब विनोदाने म्हणाले, ‘रावबहादूर, तिसरी खुर्ची नाही तुमच्यासाठी ! तेव्हा तुम्ही माझ्या मांडीवर बसा कसे !’ म्हणून बाबासाहेबांनी आपल्या उजव्या मांडीवर हात ठेवला आणि खरोखरच रावबहादूर बाबासाहेबांच्या मांडीवर जाऊन बसले. थोडीशी गंभीर पण बरीच चमत्कारिक घटना पाहून सर्वानांच हसू आले. बाबासाहेब सुद्धा मनापासून हसत आहेत ह्या फोटोमध्ये.