Categories

Most Viewed

शाहू महाराज जून महिना

दिनांक 26 जून 1874 : आरक्षणाचे जनक, लोकराजे सामाजिक सुधारणांचे कृतीशील पुरस्कर्ते, कला, संस्कृती, शिक्षण, नाटक, संगीत यांचे प्रोत्साहक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा.

Dated 26 June 1874 : Happy Birthday to Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj, the father of reservation, active supporter of Lokraje social reforms, promoter of art, culture, education, drama, music.

दिनांक 00 जून 1889 : धारवाड येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शिक्षणाला गुरुवर्य प्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ झाला.

Dated 00 June 1889 : The education of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj was started at Dharwad under the guidance of Guruvarya Prazer.

दिनांक 01 जून 1895 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी भास्करराव विठोबा जाधव यांची प्रोबेशनरी असिस्टंट सरसुभे म्हणून नेमणूक केली.

Dated 01 June 1895 : Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj appointed Bhaskarrao Vithoba Jadhav as Probationary Assistant Sarasubhe.

दिनांक 22 जून 1897 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी विक्टोरिया डायमंड ज्यूबिली लेपर असायलम या महारोग्यासाठी बांधवयाच्या इमारतीची पायाभरणी केली.

Dated 22 June 1897 : Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj laid the foundation stone of the Victoria Diamond Jubilee Leper Asylum.

दिनांक 05 जून 1900 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सरकारी वृक्षांची जोपासना करणारा कायदा सुरू केला.

Dated 05 June 1900 : Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj started a law to protect government trees along the road.

दिनांक 12 जून 1900 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी लाकडी वजने बंद करून लोखंडी काटे व वजन मापे वापरण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

Dated 12 June 1900 : Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj issued a proclamation for the use of iron scales and weighing scales by stopping wooden weights.

दिनांक 02 जून 1902 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे इंग्लंड मध्ये आगमन झाले.

Dated 02 June 1902 : Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj arrived in England.

दिनांक 10 जून 1902 : केंब्रिज विद्यापीठाकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना एल एल डी ही सन्माननीय पदवी बहाल करण्यात आली.

Dated 10 June 1902 : Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj was conferred the honorary degree of LLD from Cambridge University.

दिनांक 12 जून 1902 : सॅकसन लोकांची जुनी राजधानी विंचेस्टरला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी भेट दिली.

Dated 12 June 1902 : Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj visited Winchester, the old capital of the Saxon people.

दिनांक 18 जून 1902 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी लंडन होमिओपॅथी रुग्णालयाला भेट दिली.

Dated 18 June 1902 : Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj visited London Homeopathy Hospital.

दिनांक 16 जून 1904 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जैन वस्तीगृह बाबत राजनैतिक प्रतिनिधींना पत्र.

Dated 16 June 1904 : Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj’s letter to political representatives regarding Jain hostel.

दिनांक 16 जून 1907 : पायात घुसलेल्या भाल्याच्या जखमेची शस्त्रक्रिया राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी भूल न घेता करवून घेतली.

Dated 16 June 1907 : Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj performed the surgery on the spear wound that penetrated his leg without making any mistake.

दिनांक 25 जून 1908 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना बॉम्ब स्फोट घडवून ठार करण्याच्या अयशस्वी प्रयत्न धार्मिक दहशतवाद्यांनी केला.

Dated 25 June 1908 : Religious terrorists tried unsuccessfully to assassinate Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj by detonating a bomb.

दिनांक 29 जून 1910 : दहशतवादी दामू जोशी याला सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व पाचशे रुपये दंड राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी लावला.

Dated 29 June 1910 : Terrorist Damu Joshi was sentenced to seven years hard labor and fined Rs 500 by Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj.

दिनांक 01 जून 1912 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर नगरीस स्वस्त दराने वीज पुरवठा करण्यास एका वीज पुरवठा कंपनीस मान्यता दिली.

Dated 01 June 1912 : Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj approved a power supply company to supply electricity to Kolhapur city at a cheaper rate.

दिनांक 01 जून 1913 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी हिंदुस्तान सरकारचा सहकारी संस्थांचा कायदा करवीर संस्थानात लागू केला.

Dated 01 June 1913 : Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj implemented the Co-operative Societies Act of the Government of India in Karveer Sansthan.

दिनांक 28 जून 1913 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी प्रत्येक गावात शाळा स्थापनेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

Dated 28 June 1913 : Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj published a manifesto for the establishment of schools in every village.

दिनांक 07 जून 1915 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी इंडियन ख्रिश्चन वसतिगृहाची स्थापना केली. संस्थेस शाळा वसतिगृहाच्या इमारती बांधण्यासाठी व शेतीचे उत्पन्न मिळण्यासाठी शाहू महाराजांनी शाहू मिललगतच्या माळावरील 34 एकर 25 गुंठे एवढी मोठी जमीन संस्थाचालकांना दिली. त्या जागेवर बांधलेल्या इमारतींपैकी एका दुमजली इमारतीत हे होस्टेल चालू करण्यात आले आहे.

Dated 07 June 1915 : Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj established the Indian Christian Hostel. In order to construct school dormitory buildings and to get agricultural income, Shahu Maharaja gave 34 acres and 25 gunthas of land on the hill near Shahu Mills to Sansthachalak. The hostel is housed in a two-storey building built on the site.

दिनांक 06 जून 1916 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे धाकटे पुत्र राजकुमार शिवाजी यांचा विवाह सासवडचे शंकरराव जगताप यांची कन्या जमन्नाशी झाला.

Dated 06 June 1916 : Rajkumar Shivaji, the youngest son of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj, got married to Jamanna, daughter of Shankarrao Jagtap of Saswad.

दिनांक 10 जून 1916 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी स्वयंघोषित पुरोगामीची करवीर पीठाचे शंकराचार्य म्हणून डॉक्टर कुर्तकोटी यांची नियुक्ती केली.

Dated 10 June 1916 : Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj appointed Dr. Kurtakoti as the Shankaracharya of the self-proclaimed progressive Karveer Peetha.

दिनांक 27 जून 1916 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी उचगाव येथे छत्रपती संस्कृत महाविद्यालयाचा प्रारंभ केला.

Dated 27 June 1916 : Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj started Chhatrapati Sanskrit College at Uchgaon.

दिनांक 27 जून 1916 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जयसिंगपूर या नावाने बाजारपेठ वसाहत (शहर) निर्मितीस प्रारंभ करण्याचा आदेश दिला.

Dated 27 June 1916 : Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj ordered the construction of a market colony (city) called Jaisingpur.

दिनांक 10 जून 1918 : मुंबई इलाख्यात इंग्लंड मधील सँडहर्स्ट्र कॉलेजच्या धर्तीवर मिलिटरी कॉलेज सुरू करा असे भारत सरकारकडे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मागणी केली.

Dated 10 June 1918 : Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj demanded the Government of India to start a military college on the lines of Sandhurst College in England in the Mumbai area.

दिनांक 12 जून 1918 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे धाकटे सुपुत्र प्रिन्स शिवाजी यांचा कुंभोज जवळ असणाऱ्या जंगलात शिकार करताना घोड्यावरून पडून अपघाती मृत्यू झाला.

Dated 12 June 1918 : Prince Shivaji, the youngest son of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj, fell from his horse and died accidentally while hunting in the forest near Kumbhoj.

दिनांक 25 जून 1918 : राजर्षी छत्रपती शाहूमहाराज यांनी त्यांच्या संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला. छत्रपती शाहूंनी आजच्या दिवशी कुलकर्णी वतन रद्द करून 29 जुलै 1918 पासून तलाठी पद्धत सुरू केली.

Dated 25 June 1918 : Rajarshi Chhatrapati Shahum Maharaj issued a law to abolish the vatandari system in his state. Chhatrapati Shahu abolished Kulkarni Vatan on this day and started Talathi system from 29th July 1918.

दिनांक 25 जून 1919 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या आदेशात सांगितले की, ‘तलाठी क्लासात येणाऱ्या अस्पृश्य जातीच्या विद्यार्थ्याकरिता दहा स्कॉलरशिपा दरमहा आठ रूपये पगाराच्या तीन महिने मुदतीने मंजुर केल्या आहेत’.

Dated 25 June 1919 : Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj said in his order, “Ten scholarships for untouchable caste students coming in Talathi class have been sanctioned with a salary of Rupee’s eight.

दिनांक 07 जून 1920 : ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस एज्यूकेशन संस्था स्थापन केल्याबद्दल राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहिले.

Dated 07 June 1920 : Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj wrote a letter to Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar regarding the establishment of All India Depressed Classes Education Institute.

दिनांक 12 जून 1920 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी डिप्रेस्ड क्लास वसतिगृहास पाच हजार रुपयांची देणगी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे पाठवली.

Dated 12 June 1920 : Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj sent a donation of five thousand rupees to the Depressed Class Hostel in the name of Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar.

दिनांक 13 जून 1920 : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मूकनायकाच्या मुंबईच्या परळ कार्यालयातून एक पत्र लिहिले आहे. त्यातील महत्त्वाचा भाग असा :
माणगावच्या व नागपूरच्या सभेत पास झालेल्या ठरावास अनुसरून तारीख 26 जूनचा दिवस आपला वाढदिवस म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. त्याच दिवशी आपल्या आश्रयाखाली निघत असलेल्या मूकनायकाचा स्पेशल अंक काढण्याचे नियोजित झाले आहे. दिवस अगदी थोडे उरले आहेत. तेव्हा मी स्वतः येऊन अवश्य असलेली माहिती गोळा करण्याचे ठरविले आहे. या उद्देशास्तव मी आज संध्याकाळी तिकडे येण्याकरिता निघत आहे. मंगळवारी संध्याकाळी पोहोचेन. हुजूरच्या दर्शनाचा लाभ होईल.

Dated 13 June 1920 : Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar has written a letter to Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj from the Mumbai office of the Muknayak. The key part is: As per the resolution passed at the Mangaon and Nagpur meetings, June 26 will be celebrated everywhere as his birthday. On the same day, it is planned to release a special issue of the Muknayak who is going under his shelter. There are very few days left. So I decided that what I really needed to do was learn how to do it right. I am leaving for this purpose this evening. Arrive Tuesday evening. Huzur’s darshan will benefit.

दिनांक 15 जून 1920 : राजवाडा येथील सर्व धार्मिक विधी मराठा पुरोहित यांच्या हस्ते करण्याची राजाज्ञा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केली.

Dated 15 June 1920 : Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj ordered all the religious rites at Rajwada to be performed by Maratha priests.

दिनांक 22 जून 1920 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी नाशिक येथील श्री उदाजी मराठा विद्यार्थी वस्तीगृहास पंधरा हजार रुपयांची देणगी दिली.

Dated 22 June 1920 : Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj donated Rs. 15,000 to Shri Udaji Maratha Student Hostel in Nashik.

दिनांक 06 जून 1921 : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रंकाळा तलावाजवळ सुतार वसतिगृहाची स्थापना करुन 75′ x 50′ ची जागा बोर्डिंगला दिली.

Dated 06 June 1921 : Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj set up a carpenter’s hostel near Rankala Lake and gave 75 ‘x 50’ space for boarding.

दिनांक 30 जून 1974 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मशताब्दी महोत्सवाचा प्रारंभ नामदार वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना कोल्हापूर येथे अतिशय उत्साही वातावरणात आणि थाटामाटात पार पडला.

Dated 30 June 1974 : The inauguration of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj’s birth centenary celebrations took place in Kolhapur with great enthusiasm and pomp when Namdar Vasantrao Naik was the Chief Minister of Maharashtra.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password