Categories

Most Viewed

होता तो भीम माझा कोहिनूर भारताचा 

होता तो भीम माझा कोहिनूर भारताचा 
बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा II

जीवनपथास उजळे होऊनी दीपस्तंभ 
प्रबुद्ध बौद्ध करण्या केला इथे आरंभ 
उज्ज्वल भविष्यासाठी झिजला तो देह त्यांचा 
बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा II

पांडित्यपूर्ण शैली होती ती भाषणाची 
सदैव दूरदृष्टी दृढनिश्चयी भीमाची 
बाबांचा मानी पिंड बुद्धीच्या सागराचा 
बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा II

ग्रंथात ग्रंथरूपी राही अमर तो आज 
विष्णू कधी ना लोपे प्रगल्भ भीमराज 
गुणवान पूज्य ठरला आदर्श गौतमाचा 
बुद्धाचा मार्ग त्यांनी दाविला तारणाचा II

गीत : विष्णू डांगे 
गायक : शाहीर विठ्ठल उमप 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password