Categories

Most Viewed

06 जून दिनविशेष

दिनांक 06 जून 1950 : अखिल सिलोन दलित फेडरेशनच्या विद्यमाने आयोजित कोलंबो येथील टाऊन हॉलमध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “बौद्ध धम्माशिवाय अस्पृश्यांना दुसरा कोणताही मुक्तीचा मार्ग नाही. फक्त बौद्ध धर्मातच अस्पृश्यतेच्या निवारणाचा चिरकालीन उपाय आहे”.

Dated 06 June 1950 : Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar delivered a speech at the Town Hall in Colombo organized by the All Ceylon Dalit Federation. At the time, he said in his speech, “There is no other way for the untouchables to be liberated except in the Buddhist Dhamma. Only in Buddhism is there a permanent solution to the problem of untouchability.”

दिनांक 06 जून 1927 : महाडच्या चवदार तळ्यातील दंगेखोरांना न्यायाधीशाने चार महिन्याची सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावल्यानंतर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी असे उद्गार काढले की, “न्यायालयातील मुख्याधिकारी स्पृश्य हिंदू असते तर आपल्याला कदाचित न्याय मिळाला नसता. पेशव्यांचे राज्य असते तर अशा सामाजिक बंडखोरांना हत्तीच्या पायाखाली देण्यात आले असते”.

Dated 06 June 1927 : After the judge sentenced the rioters at Mahad’s Chavdar Lake to four months imprisonment, Vishwaratna Dr Babasaheb Ambedkar exclaimed, “If the chief justice of the court had been a Hindu, we would not have got justice. If there was a Peshwa state, such social rebels would have been given under the feet of elephants”.

दिनांक 06 जून 1940 : घटना समितीने संघराज्याची मूलतत्वे ठरविण्यासाठी एक उपसमिती गठित केली होती. या उपसमितीचे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सभासद होते.

Dated 06 June 1940 : The Constitution committee had formed a subcommittee to decide the basics of the federation. Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkar was a member of this sub committee.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*

    Forgot Password